आपले केज

जनाबाई बचुटे यांचे वृद्धापकाळाने निधन ; पत्रकार गौतम बचुटे यांचा सांभाळ कलेले मातृत्व हरवले

वादळवार्ता – दु:खद वार्ता

जनाबाई शहाजी बचुटे वय वर्षे ८५ रा. साळेगाव यांचे काल दि. १७ वार सोमवार रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

जनाबाई बचुटे या जुन्या पिढीतील एक कष्टकरी, मेहनती आणि प्रामाणिक महीला म्हणून संपूर्ण गावात परिचित होत्या. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांबरोबरच लहान पणीच आई विना पोरके झालेले आपले दोन पुतण्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून चांगले संस्कार व शिक्षण देत सर्व मुले सुशिक्षित केले आहेत. त्यांच्या मेहनती मुळे सर्व सामान्य कुटुंब नौकरीदार कुटुंब बनले आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा रावसाहेब शहाजी बचूटे माजी सैनिक, अंनत शहाजी बचुटे शेती, गौतम बचुटे पत्रकार, बलभीम बचुटे वाहक, नातू डॉ. आकाश बचुटे, विद्याभुषण, डॉ. विवेक, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने बचुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व साळेगाव येथील नागरीकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय नेतेमंडळी व पत्रकार यांनी बचुटे कुटुंबाच्या दुखाःत सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केली आहे.

या माझ्या चुलती होत्या आणि आईचा मला व भावाला चेहरा आठवू शकत नसताना आणि आई कशी होती ही कल्पना करीत नसताना तिने आम्हाला मोलमजुरी करून शिकविले व सांभाळले. आम्ही दोघे पुतणे ( गौतम व बलभीम) आणि तिची दोन मुले (रावसाहेब व अनंत) असलो तरी ती सर्वाना माझी चार मुले म्हणूनच सांगत होती. गावातील अनेकांना माहीत नाही की ती माझी चुलती होती म्हणून खऱ्या अर्थाने ती आमची आईच होती. असे म्हणत पत्रकार गौतम बचुटेना रडु कोसळले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!