“शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यात समन्वयकाची प्रामाणिक भूमिका पार पाडनार:” एम. गिरी सर
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
संपूर्ण भारतात समाजहीत जपत सर्वच क्षेत्रात बहुउद्देशीय कार्य करणारी राष्ट्रीय पातळीवरील ‘राष्ट्रीय विश्वगामी संघ’ संचलित, “राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक संघाच्या” केज तालुकाध्यक्ष पदी विद्याधन शिक्षण समूहाचे संचालक, श्री. महादेव प्रल्हाद गिरी यांची निवड करण्यात आली.
यावेळी ते आमच्याशी बोलताना म्हणाले की, “शिक्षक-पालक-विद्यार्थी यांच्यात समन्व्यय ठेवून विद्यार्थी हिताचे कार्य करत राहील आणि विद्यार्थ्यांसाठी केज तालुकास्तरीय नवोपक्रमांचे आयोजन करण्यास तत्पर राहील तसेच शिक्षण क्षेत्रात शै. घडामोडी, नवोपक्रम आणि शै. माहितीची आदान-प्रदान करून एक शिक्षक मित्र म्हणून या क्षेत्रात अधिक चांगले काम करण्यास मी कटीबद्ध राहील.” असे मत एम. गिरी सर यांनी बोलताना व्यक्त केले.
सर्वच क्षेत्रातून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव झाला. केज तालुक्यात शिक्षकांची एकी राहण्यास मदत होईल हीच अपेक्षा.