वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
लाडक्या बप्पाला निरोप देताना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनीही वाद्याच्या तालात ठेका धरला.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय येथील गणपतीची आरती पंकज कुमावत यांच्या आई-वडील, आजोबा आणि धर्मपत्नी यांच्या उपस्थितीत व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. मिरवणुकीत वाद्याच्या तालावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी बँड आणि हलगीच्या तालावर ठेका धरला. यावेळी उपस्थित गणेश भक्त आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जल्लोष करून दाद दिली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!