आपला बीड जिल्हाआपले केज

किती करतात कष्ट, किती निघतोय घाम.. केज पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे मनावरच चाललंय काम!

ऑफिसची वेळ सव्वासहाची ; पण साडेपाचलाच अधिकारी होतात फरार

वादळवार्ता / केजएक तर या सरकारने सात दिवसावरुन आठवडा पाच दिवसाचा केला. त्यात काही सुट्या येतात . याअगोदर शासकीय कर्मचाऱ्यांना सात दिवसाचा आठवडा असायचा मात्र आत्ता पाच दिवसांचा आठवठा केला आहे .आणी तसे शासकीय परिपत्रक हि काढले आहे . सदरील परिपत्रकामध्ये स्पष्ट नमुद केले आहे कि कर्मचार्‍यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायं . ६ .१५ वाजेपर्यंत मात्र केज पंचायत समितीचे कर्मचारी मनमर्जीने कार्यालयीन वेळ ठरवून ये-जा करत असताना दिसुन येतात.

या बाबत अधिक माहिती अशी की वादळ वार्ताचे प्रतिनिधी दि. १७ ऑगस्ट रोजी सायं ५. ३० वाजता पंचायत समितीच्या कार्यालयात गेले असता. त्या ठिकाणी खळबळ जनक माहिती समोर आली ती म्हणजे कार्यालयातील पाच ते सहा कर्मचारी व शिपाई सोडता, इतर सर्व कर्मचारी वर्गानी सायं ५.४५ वाजताच शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपआपल्या विभागाला कुलूप ठोकुन धुम ठोकली. यामध्ये विशेष म्हणजे बीडीओ मोराळे यांच्या ऑफीसला तसेच अंगणवाडी विभागाला व बांधकाम विभागाल ताळे ठोकलेले निदर्शनास आले तर काही विभागामध्ये एक दोन कर्मचारी सोडता इतर कर्मचारी आढळुन आले नाही .पाच दिवसाचा आठवडा केला त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मनावर काम करण्याची संधी मिळु लागली आहे. त्याबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयीन राहाण्याचे शासकीय आदेश असताना मात्र मोठया प्रमाणात कर्मचारी लातुर , बीड , अंबाजोगाई वरून ये-जा करतात. त्यामुळे केज पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना आरामात काम करण्याण्याचे तसेच ते काम म्हणजे कोणाचे, कसे आणि कधी करायचे हे त्यांच्याच मनावर झाले आहे.त्यामध्येही कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १ व २ च्या दरम्यान आरध्या तासाची सुट्टी घेण्याचे आदेशीत असताना मात्र कर्मचारी जेवणासाठी एक ते दीड तास घेतात त्यामुळे केज तालुक्यातुन येणार्‍या लोकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे . यामध्ये गटविकास अधिकारी मोराळे यांचा कर्मचार्‍यानंवर कसल्याही प्रकारचा अकुंश राहीलेल दिसून येत नाही. त्यामुळे आरध्या ते एक तास अगोदर धुम ठोकणार्‍या कर्मचार्यांनवर केजचे गटविकास अधिकारी कारवाई करतील का ? कर्मचार्‍यांना एवढे सारे सवडशास्त्र असताना देखील केज पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी शिपाई आणि काही कर्मचारी वगळता साडेपाचलाच फरार होतात. दुपारी चारपासुनच या कार्यालयात शुकशुकाट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे या अशा वेळेच्या अगोदर फरार होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना जाब कोण विचारणार कि नाही ? हे पहाणे तेवढेच गरजेचे आहे.

त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त लागेल काय ? गटविकास अधिकारी कारवाई करतील काय ? असा प्रश्न केज तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला पडला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!