आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

ऊसतोड मजुरांचे भांडणात मध्ये बोलणे ड्रायव्हरच्या अंगलट आले….!

वादळवार्ता – गौतम बचुटे

ऊसतोड मजुरांचे भांडण सोडविन्यासाठी मध्ये बोलणाऱ्या एका ड्रायव्हरच्या चांगलेच अंगलट आले. भांडण सोडविण्यासाठी मध्ये बोलणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचे डोके फोडले आहे.

या बाबतची माहिती अशी की, बेबडेवाडी येथे ऊसतोडणीचे काम करीत असलेले ऊसतोड मजूर रामचंद्र डिगांबर काळे, रघु रामचंद्र काळे, सत्वशीला रामचंद्र काळे आणि रघु रामचंद्र काळे यांची पत्नी यांच्यात दि. १ मार्च रोजी रात्री ९:३० वा च्या सुमारास बोबडेवाडी येथील ऊस तोडणी सुरू असलेल्या पांडुरंग करपे यांच्या शेतात भांडण सुरू होते. ते एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत होते. म्हणून त्यांच्या सोबत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेले प्रवीण लाला बचुटे हे त्यांना म्हणाले की तुम्ही अशी शिवीगाळ करू नका. असे म्हणाले म्हणून रामचंद्र डिगांबर काळे, रघु रामचंद्र काळे, सत्वशीला रामचंद्र काळे आणि रघु रामचंद्र काळे या चौघांनी संगणमत करून ड्रायव्हर प्रवीण बचुटे याला शिवीगाळ करून तु आमच्या भांडणात का बोललास ? असे म्हणुन जिवेच मारून टाकतो अशी धमकी देवुन रामचंद्र डिगांबर काळे व सत्वशीला रामचंद्र काळे या दोघांनी त्यांना धरले. तर रघु काळे याने त्याच्या हातातील काठीने उजव्या बाजूला डोक्यात मारून डोके फोडुन जखमी केले.

या प्रकरणी प्रवीण बचुटे यांच्या फिर्यादी वरून रामचंद्र काळे, रघु काळे, सत्वशीला काळे आणि रघु काळे  चौघा विरुद्ध दि. २ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ११९/२०२३ भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार महावीर सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!