आपला बीड जिल्हाआपले केज

केज तालुक्यातील प्रसिद्ध आश्या KPL क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे आयोजन

वादळवार्ता – केज

केज तालुक्यातील तरुणाई ज्या क्रिक्रेट स्पर्धेची अतुरतेने वाट पाहत होते ती KPL क्रिक्रेट स्पर्धेचे उद्घाटन दि. 16 जानेवारी रोजी सपन्न होणार आहे.

सविस्तर वृत्त असे क्रिक्रेट हा केज तालुक्यातील लोकप्रिय व जनाधार असलेला खेळ आहे या खेळा मध्ये केज तालुक्याची गौरवशाली परमपरा आहे या परमपरेला कायम ठेवण्यासाठी व केज तालुक्यातील उदन्मुख खेळाडूना चालना देण्यासाठी व केज तालुक्यातील सामाजीक बांधीलकी जोपसण्याच्या हेतुने गेल्या पाच वर्षापासुन KP L चे मुख्य आयोजक तथा बजरंग बप्पा सोनवणे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शद्दो खतीब KPL स्पर्धेचे आयोजन करतात.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंचायत समीतीच्या मैदानामध्ये सदरील स्पर्धेचे आयोजन तथा उद्घाटनाचा कार्यक्रम दि 16 जानेवारी रोजी ठिक दुपारी 01 वाजता होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन केज तालुक्याचे नेते बजरंग सोनवणे तथा स्पर्धेचे उद्‌घाटक म्हणुन केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन पप्पु इनामदार , पिन्टु ठोंबरे , सय्यद नवाब मामु ,भाऊसाहेब गुंड, उपस्थित रहाणार आहेत तरी केज तालुक्यातील तथा शहरातील क्रिकेट प्रेमीनी उद्यापासुन सुरु होणाऱ्या किक्रेट मॅचेस व उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन KPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजक तथा बजरंग बप्पा सोनवणे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शद्दो खतीब यांनी केले आहे.

केज तालुक्यातील तथा शहरातील क्रिकेट प्रेमींनी उद्यापासुन सुरु होणाऱ्या किक्रेट मॅचेस व उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे .

शददो खतीब

KPL आयोजक तथा बजरंग बप्पा सोनवणे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!