वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे चोरट्यांनी सात घरांची घरफोडी केली असून तिघांच्या घरातील सोन्याचे दागिने व नगदी रोख रक्कम चोरीला गेली आहे.
या बाबतची माहिती अशी की, रविवार दि. २५ डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटे च्या दरम्यान चिंचोली माळी येथील
फक्रुद्दीन हुसेन शेख, बाळासाहेब उर्फ जयदत्त गलांडे, विकास देशमुख,दत्ता काळे, सलीम शेख, नागनाथ काळे आणि लिंबराज मगर या सात जणांच्या अज्ञात चोरट्यानी घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
यात फक्रुद्दीन हुसेन शेख यांच्या घरातील मंगळसूत्र व दागिने मिळून सोने दीड तोळा सोन्याचा ऐवज चोरीला गेला. बाळासाहेब उर्फ जयदत्त गलांडे यांच्या घरातून त्यांच्या बहिणीचे दागिने चोरीला गेले आहेत. तसेच
विकास देशमुख यांच्या घरातून नगदी ४ हजार रु तर दत्ता काळे यांच्या घरातील १० हजार रु. चोरट्यानी लांबविले. एकाच रात्री सात घरे फोडले असल्याने चिंचोली माळी आणि परिसरातील नागरिकांत व वस्त्यांवर घबराट पसरली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि बिट जमादार पोलीस नाईक राजू गुंजाळ व पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळी श्वान पथक रवाना :-
या घरफोडीचा तपास करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वानपथक रवाना झाले असून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सूरु आहे.