आपला बीड जिल्हाआपले केज

पाच कोटी रुपयांच्या केजच्या विकास कामांचे उद्घाटन २९ मार्चला होणार…

शासकीय विश्रामगृह येथे स्वीकृत सदस्य हारुण इनामदार यांनी घेतली पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष , नगरसेवक , मुख्याधिकारी , न.प. कर्मचारी यांची अनुपस्थिती 

वादळ वार्ता – केज

केज शहराची लोकसंख्या जवळपास ३५ हजारांच्या वर आहे . ग्रामपंचायत ते नगरपंचायत आणी भविष्यात नगरपंचायत ते नगरपरिषद असा प्रवास केज शहराचा होत आहे . आशा परिस्थितीत लोकसंख्येने, क्षेत्रफळाने केज शहराचा विस्तार होत आहे . परंतु या सर्व गोष्टी होतं असताना केज शहर विकासा पासुन वंचित असल्याचे केज शहरातील जनतेस पहावयास मिळत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने २५ वर्षापासून प्रतिक्षेत असलेला उमरी रस्ता आणी त्यासाठी झालेली लोकसहभागातून आंदोलने.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि दि.२६ मार्च वार रविवार रोजी सायं. ५.३० वाजता केज नगरपंचायचे स्वीकृत सदस्य हारुण इनामदार यांनी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी ५०० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन दि २९ मार्च बुधवार रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार नमिता मुंदडा , नंदकिशोर मुंदडा , अक्षय मुंदडा , आदित्य पाटील , रमेश आडसकर , अंकुश इंगळे , दिलीपराव गुळभिले ,महादेव सुर्यवंशी , प्रा. विनोद गुंड उपजिल्हाधिकारी शरद झाडके व तहसीलदार दुलाजी मेंडके, तथा नगरसेवक , नेतेगण, पत्रकार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र सदरील पत्रकार परिषदेस केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष , नगरसेवक , मुख्याधिकारी , न.प. कर्मचारी यांची अनुपस्थिती होती तर पत्रकार परिषद केज नगरपंचायत मध्ये घेण्या ऐवजी शासकीय विश्रामग्रह केज येथेच का ? नगराध्यक्ष , नगरसेवक , मुख्याधिकारी , न.प. कर्मचारी यांची अनुपस्थिती का ? आदि प्रश्न केज शहरातील विकासाची प्रतिक्षा करणाऱ्या जनतेच्या चर्चेमधुन समोर येत आहेत.

आम्ही भाजपा सोबत नसुन केजच्या विकासा सोबत आहोत.

बजरंग सोनवणे

जेष्ट नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस

________________

आम्ही केजच्या विकासासोबत .

आदित्यदादा पाटील

_______________________

सदरील पत्रकार परिषदेची कोणत्याही स्वरूपाची माहिती नाही. अधिकृत पत्रकार परिषद घेणे गरजेचे .

भाउसाहेब गुंड

केज न.प.गटनेते

_______________________

केज नगर पंचायत वतीने पाच कोटी रुपयांच्या विकास कामांची वर्क ऑर्डर नसताना उद्घाटनाची तारिख जाहिर करणे चुकिचे .

कपिल मस्के

माजी नगसेवक न. प . केज

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!