वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील पाथरा येथे अनुसूचित जातीच्या पती पत्नीला लाकडाने मारहाण केली म्हणून एका विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ३१ जुलै रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरा ता. केज येथे एका अनुसूचित जातीतील रागिणी कैलास राऊत ही इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी ही घरा समोरील विद्युत खांबाच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करीत होती. त्यावेळी ज्ञानेश्वर पवार हा मुलांना घेऊन त्या ठिकाणी आला आणि गोंधळ घालू लागला. ही घटना मुलीच्या आईने ज्ञानेश्वर पवार यांच्या आई वडिलांना सांगितली व त्याला समज द्या अशी कल्पना दिली. म्हणून हा प्रकार त्याच्या आई-वडिलांना का सांगितला ? म्हणून ज्ञानेश्वर पवार याने दि. १ ऑगस्ट सायंकाळी ८:०० वा. च्या सुमारास सीमा राऊत व कैलास राऊत या पती-पत्नी घरी असताना ज्ञानेश्वर पवार हा त्यांच्या घरी आला आणि म्हणाला की, त्याच्या आई-वडीलांना त्याच्या बद्दल काही पण का सांगीतले ? असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ केली. त्याने त्याचे हातातील लाकडी काठीने सीमा राऊत डावे पायाचे पिंढरीवर मारुन मुक्कामार दिला. तसेच कैलास राऊत यांच्या उजव्या हाताच्या बोटावर काठीने मारुन दुखापत केली.
या प्रकरणी सीमा राऊत यांच्या तक्रारी वरून ज्ञानेश्वर पवार यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १७१/२०२३ भा. दं. वि. ३२३, ५०४, ५०६ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३(१) (आर), ३(१) (एस), ३ (२) ( व्ही ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!