आपला बीड जिल्हाभ्रष्टाचार

भाटुंबा ग्रामपंचायत भ्रष्टाचार , मतदान यादी घोळ प्रकरणी चौकशी समिती गठीत

चौकशीचा अहवाल आल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्यावर उपोषणार्थी ठाम

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

प्रभाग रचनेसह विविध भ्रष्ट्राचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी मागील तीन दिवसा पासून सुरू असलेले उपोषण हे चौथ्या दिवशीही सुरू आहे. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक चौकशी समिती गठीत केली आहे. परंतु जोपर्यंत चौकशी होत नाही आणि चौकशी अहवाल प्राप्त होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याच्या मुद्द्यावर उपोषणार्थी ठाम असल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे आणि भाटुंबा येथील सरपंच सुनील धपाटे यांच्या नेतृत्वाखाली भाटुंबा गावातील सुमारे ३० ते ३५ नागरिक मागील चार दिवसां पासून चुकीचे वार्ड रचना केली आहे; पाच वर्षा पूर्वी मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या कामाचे वेतन अदा झालेले नाही. त्याची चौकशी करावी. ग्रामपंचायतचे संगणक चोरून नेलेले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत केलेल्या भ्रष्टाचार. अंगणवाडी बांधकामाचे खोटे दस्तावेज देऊन पैसे उचलले. आर ओ फिल्टर न बसविता कागदो-पत्री बसविलेले दाखवून पैसे उचलले आहेत. आर ओ फिल्टरसाठी रूम बांधकाम न करता पैसे उचलले आहेत. इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर असलेल्याव लाभार्थ्यांनी बांधकाम न करता जुने बांधकाम दाखवून पैसे उचलले आहे. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघड़ करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. या सर्व बाबींची चौकशी करून यावर कारवाई करावी या मागणीसाठी मागील चार दिवसा पासून उपोषणाला बसले असून पाचवा दिवस आहे.

चौकशी समिती गठीत :-

दरम्यान दि. १२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या आदेशाने पत्र क्र /जा.क्रं / साप्रवि -७ /पं .३/कावि /२०२२ क्र. ९४१२ च्या आदेशाने पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुमित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी गठीत करण्यात आली आहे. या तीन सदसिय समितीत राख बी. एस., एम. एस. निंबाळकर यांचा समावेश असून पंधरा दिवसाच्या मुदतीत अहवाल सादर करण्याची अट आहे.

उपोषण सुरूच :-

चौकशी समिती गठीत केली असली तरी जो पर्यंत चौकशी अहवाल सादर होत नाही; तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्यावर उपोषनार्थी ठाम असून पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

उपोषनार्थीची प्रकृती ढासळली :-

उपोषणाला बसलेले काही जण वयोवृद्ध असल्याने त्यांची प्रकृती ढासळली असून वैदयकीय अधिकारी वेळोवेळी त्यांच्या तपासण्या करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!