आपला बीड जिल्हाक्राईम

पंकज कुमावत यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड ; ४४ हजराचा मुद्देमाल केला जप्त : १७ जुगाऱ्यावर कारवाई

पंकज कुमावत यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड ; ४४ हजराचा मुद्देमाल केला जप्त : १७ जुगाऱ्यावर कारवाई

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज :- दबंग आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केज येथील जुगार अड्यावर छापा टाकला यात त्यांनी सतरा जुगाऱ्यावर कारवाई करून त्यांच्या कडून ४४ हजार रु. चा मुद्देमाल तांब्यात घेतला.

या बाबतची माहिती अशी की, केज शिवारातील बळी यशवंत घुले यांचे शेतातील घरा समोरील मोकळ्या पटांगणात झन्ना -मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती एका गुप्त खबऱ्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दिली.

माहितीची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि पोलीस जमादार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, रामहरी भंडाने, विकास चोपणे, संजय टुले यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी श्रावण सदाशिव माने आणि बालाजी चांगदेव घुले यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या कडून रोख १८०० रु. तीन मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असे एकूण ४४ हजार रु. चा मुद्वेमाल ताब्यात घेतला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहिती वरून श्रावण सदाशिव माने आणि बालाजी चांगदेव घुले यांच्यासह पोलीस पथकाला पहाताच पळून गेलेले क्लब मालक नवनाथ शिवाजी घुले,  शिंदे, बळी घुले, इनामदार, शिवराम वैजनाथ बोबडे आणि जुगार खेळणारे रेवण अप्पा नखाते, अक्षय मुळे, ऋशीकेश मस्के, राजु लोखंडे, मिटु राउत, अशोक सदाशीव घुले, अशोक दत्तात्रय बारगजे, जिवन जालींदर शिरसाट, शेख शन्नु आणि फारुक फ्रुटवाला यां १७ जणांच्या विरुद्ध पथकातील पोलिस जमादार बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!