आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम
भुसा वाहतूक करणाऱ्या सात वाहनावर पोलिसांची कारवाई

वादळवार्ता – गौतम बचुटे
केज पोलिसांनी भुसा वाहतूक करणाऱ्या सात वाहनावर कारवाई केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे व वाहतूक शाखेचे नितीन जाधव हे दि. ३०मार्च रोजी ७:०० वा. च्या सुमारास केज शहरात गस्त घालीत असताना नागनाथ शिवाजी जाधव (रा. वेणेगाव ता. महाडा जि. सोलापूर), तेजस अजिनाथ पवार, (रा. वेणेगाव ता. महाडा जि. सोलापूर), विशाल पंडित ठोंबरे, (रा. टेंभुर्णी ता. महाडा जि. सोलापूर), विशाल रामदास जाधव, (रा. टेंभुर्णी ता. महाडा जि. सोलापूर), सुभाष शामराव कडते, (रा. जळकोट ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद), संजय उर्फ संजू भीमराव कडते, (रा. जळकोट ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद), राजेंद्र उर्फ राजू शामराव कडते, (रा. जळकोट ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) या सात चालकांनी त्यांच्या ताब्यातील भुस्याने भरलेले ट्रक अनुक्रमे क्र. (एम एच-१३/आर-४५२८), (एम एच-०४/इ एल-५३०९), (एम एच-१३/ ए एक्स-४६४९), (एम एच-०६/ ए क्यू-६८८९), (एम एच-१३/ए एक्स-४६२९), (एम एच-२५/यु-२९९९) आणि (एम एच-१२/एम व्ही-२२५५) हे सात वाहने केज येथील कळंबकडे जाणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकात रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होवुन लोकांचे जिवीतास धोका निर्माण होइल अशा रितीने उभी केलेली होती. त्यामुळे पोलीस नाईक नितीन जाधव यांच्या तक्रारी वरून त्यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा दं वि २८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिण पाचपिंडे, त्रिंबक सोपणे, बाळासाहेब अहंकारे, श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.
रस्त्यावरून भुसा वाहतूक करणाऱ्या वाहनात प्रमाणापेक्षा जास्त भुसा भरल्याने ओव्हरटेक करणाऱ्या व साईड घेणाऱ्या वाहनाला अपघात होण्याची शक्यता असून त्यातून उडणाऱ्या भुस्यांमुळे दुचाकी चालक यांनाही धोकादायक आहे.



