आपला बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बाप रे ! ऐवढे मोठे महाकाय अजगर….

वादळवार्ता वार्तांकन – परळी वैजनाथ

परळी मधील देव्हाडा शिवारात एका शेतात सर्पमित्र नितीन गायकांबळे यांनी पकडले तब्बल 12 ते 13 फुटाचे महाकाय अजगर 

परळीच्या अगदी लगत असलेल्या देव्हाडा या शिवारामध्ये नितीन गायकांबळे या सर्पमित्र तरुणाने वनविभागाच्या मदतीने पकडले महाकाय अजगर परळी वैजनाथ या शहरापासून अगदी लगत असलेल्या कन्हेरवाडी भागातील देव्हाडा शिवारामध्ये आज सायंकाळच्या सुमारास तब्बल 12 ते 13 फुटाचे अजगर तेथील शेतकऱ्यास शेतामध्ये दिसून आले लागलीच तेथील लोकांनी  वन विभागात व सर्पमित्र यांना संपर्क केला व कुठल्याच प्रकारचा वेळ न दवडता वन विभागातील मुकुंद मुंडे व  सर्पमित्र नितीन गायकांबळे यांनी त्या ठिकाणी पोहोचून ते महाकाय असलेले अजगर पकडले.

सर्पमित्र नितीन गायकांबळे यांनी हे अजगर वनविभागाच्या मदतीने पकडून त्यास निर्मनुष्य असलेल्या डोंगरी भागात सोडून दिले. परळीमध्ये कुठेही साप अजगर अथवा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जातीचा साप आढळून आला की एकच नाव आठवते ते म्हणजे नितीन गायकांबळे आणि हा हरहुन्नरी तरुण कुठल्याच प्रकारचा आळस न करता कोणत्याही क्षणाला त्या ठिकाणी पोहोचतो.एक तर हा तरुण समाजामध्ये असणारी सापाबद्दलची भीती दूर करून सापापासून समाजाचे संरक्षण करतो त्याचबरोबर तो सर्पमित्र  या नात्याने त्या सापाला कुठल्याच प्रकारची इजा न होऊ देता तो दुर्गम भागामध्ये निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी डोंगरामध्ये त्या सापाला सोडतो याच माध्यमातून तो समाजाची सेवा ही करतो व आपला छंदही जोपासतो.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!