आपला बीड जिल्हाक्राईम

तिरर्ट नावाचा जुगार खेळताना दहा जुगार्‍यावर पोलीसांची धाड

वादळवार्ता वार्तांकन केज

केज येथे एका पत्त्याच्या क्लब वर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका पत्र्यांच्या शेड मध्ये दहा जुगारी हे तिरर्ट नावाचा जुगार खेळताना अढळून आले. पोलिसांनी त्यांच्या कडून मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना गुप्त माहिती मिळाली की, केज येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिल टी हाऊसच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालू आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांचे अधिनिस्त अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते व पोलिस नाईक शमीम पाशा यांना सोबत घेऊन शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रात्री ९:३० वा. सदर ठिकाणी अचानक धाड टाकली. तेव्हा तेथे केज येथील सुरेश बापु काळे वय (३२ वर्षे) रा. क्रांती नगर, अजिम नजमोद्दीन ईनामदार वय (३०वर्ष) रा. रोजा मोहल्ला, बाळू अर्जुन गाढवे वय (४० वर्षे ) रा. अहिल्यादेवी नगर, दिपक खंडू काळे वय (२२ वर्षे) रा . कानडी रोड, ईरफान कश्मीर सय्यद वय (२० वर्षे) रा. क्रांती नगर, ईसाक रज्जाक शेख वय (२४ वर्षे) रा. कोकीसपीर, कानडी रोड, रामभाऊ नारायण चांदने वय (३०वर्ष) रा. समर्थ नगर, रामेश्वर दत्तात्रय राऊत वय (४२ वर्षे ) रा. लोंढे गल्ली, अमीर शहामोद्दीन ईनामदार वय (३२ वर्ष) रा. रोजा मोहल्ला, आणि कलीम अहेमद सय्यद वय (४२ वर्ष) रा. अजीजपुरा, केज असे दहा जुगारी आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून नगदी रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असे एकूण ३३ हजार ३३० रु. मुद्देमालासह जप्त केले.

या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांच्या फिर्यादी वरून सुरेश बापु काळे, अजिम नजमोद्दीन ईनामदार, बाळू अर्जुन गाढवे, दिपक खंडू काळे, ईरफान कश्मीर सय्यद, ईसाक रज्जाक शेख, रामभाऊ नारायण चांदने, रामेश्वर दत्तात्रय राऊत, अमीर शहामोद्दीन ईनामदार आणि कलीम अहेमद सय्यद या दहा जुगाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!