मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाची आंदोलन करू – भाई गुंड
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज मंडळासह तालुक्यातील इतर मंडळातही सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हातात तोंडाला आलेले सोयाबीन येल्लो मोजॅक चक्रीभुंगा,आळी इतर रोगाने पूर्ण सोयाबीन गेलेला आहेत पिक विमा कंपनीचे अधिकारी शेतात फिरकायला तयार नाहीत,तात्काळ पंचनामे करून सरसकट अनुदान देण्यात यावे. केज नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना ग्रामीणच्या योजनेलाभ पंधरा वर्षांपासून मिळत ग्रमीणच्या योजनेचा लाभ द्यावा , सटवाई रस्ता वर्षभरापासून बंद आहे ते धारुर रोडवरील सटवाई रस्त्यावरचे अतिक्रमण तात्काळ काढा, केज शहरातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी विद्युत पुरवठा सुरुळीत करा. या मागणीसाठी केज शहरात आंबेजोगाई बीड रोडवर संभाजी राजे चौकात (मंगळवार पेठ कॉर्नर) शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अर्धा रस्ता आंदोलन करण्यात शहरात रास्तारोको असल्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता तहसिलचे प्रतिनिधी पवार यांनी निवेदन स्वीकारले, निवेदनात म्हटले आहे निवेदन वरिष्ठांकडे कळवुन वरील मागण्या मांडुन तात्काळ विचार करावा अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
यावेळी भाई मोहन गुंड नगरसेवक सोमनाथ गुंड, मनोराम पवार, ॲड निखिल बचुटे,शुभम लोंढे, संदिप नाईकवाडे, संजय लोंढे, सुभाष कोल्हे,चंद्रकांत गुंड,अशोक रोडे , शाम चिंचोलीकर, दिनकर कदम, किशोर सुरवसे, रवी लोंढे, शेटे आप्पा, राजेभाऊ औटी, पांडुरंग हासवले,पोपट लोंढे, महेश लोंढे, राम डुकरे आकाश चौरे, शकील शेख,अशोक गुंड, मुन्ना धनवडे या सह गावातील शेतकरी उपस्थित होते.