वादळवार्ता वार्तांकन – मुबशीर खतीब
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील एका सख्या भावानेच शिक्षक भावाच्या पाठीवर जोराचा घेतला चावा केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील चिचोंली माळी येथील कमलाकर बंन्सीधर गलांडे वय वर्ष 50 व्यावसाय सहशिक्षक रा. चिंचोलीमाळी हे आपल्या शेतातील पत्राच्या शेडच्या बाजुचे गवत काढीत असतांना त्या ठिकाणी प्रकाश बन्सीधर गलांडे व कविता भ्र. प्रकाश गलांडे हे सगंनमत करून आले असता त्यांनी कमलाकर बंन्सीधर गलांडे यांना तुझे येथे काय संबध आहे तु येथे गवत काढायचे नाही असे म्हणुन कमलाकर बंन्सीधर गलांडे यांना शिवीगाळ करुण आरोपी प्रकाश बन्सीधर गलांडे यांने पाठीवर डाव्या बाजुस तसेच डाव्या बगलाच्या खाली तोंडाने चावा घेऊन तु जर पोलीस ठाण्यात जाऊन आमच्यावर केस केलीस तर तुझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली म्हणुन केज पोलिस ठाण्यात प्रकाश बन्सीधर गलांडे व कविता भ्र. प्रकाश गलांडे यांच्या विरुद्ध गुरनं.489/2022 प्रमाणे कलम -324,504,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. गुंजाळ हे करत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!