केज नगरपंचायत च्या सुस्त कारभारामुळे, आढमुठ्ठेपणाच्या धोरणामुळे ; सर्वसामान्य नागरीक परेशान म्हणुन घेतला निर्णय !
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
नगरपंचायतच्या ढिसाळ कारभारापुढे वैतागुन तथा सत्ताधार्यानी नुसताच १०० दिवसाचा फुसकाबार केल्यामुळे अंदोलनाचे शस्त्र उभारत ऐन स्वांतत्र्यदिनी केज च्या नगरपंचायत विरोधात विकासासाठी आघाडीत बिघाडी करून काँग्रेसचे माजी नगरसेवक कपिल मस्के यांचे अन्नत्याग अंदोलन .
सविस्तर वृत्त असे कि असे कि फुलेनगर केज मधील विविध विकासकामाच्या संदर्भांत कॉंग्रेसचे माजी नगसेवक कपिल मस्के येत्या पंधरा ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधुन अन्नत्याग अंदोलन करणार आहेत असे निवेदन केज न.प. चे मुख्याधिकारी देशपांडे तथा केजचे तहसिलदार दुलाजी मेंढके यांना देण्यात आले .
त्यामध्ये वार्ड क्र. आठ मधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सभाग्रहाचे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे तसेच कळंब रोड ते जलाल नगरचा रस्ता ३३ फुटाचा करण्यात यावा , फुलेनगरमधील प्रधानमंत्री आवास योजनेतील मुस्लीम लाभार्थ्यास व रमाई आवास योजनेतील लाभार्थ्याचा पहिला दुसरा तिसरा हप्ता तात्काळ द्यावा यासह अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी येत्या स्वांतत्र्यदिनापासुन फुलेनगर येथे अन्नत्याग अंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!