ब्रेकिंग न्युज

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

वादळवार्ता वार्तांकन

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12 : 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी

 मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

‘अफवांवर विश्वास ठेवू नका’

दरम्यान या अपघाताबाबत धनंजय मुंडे यांनी स्वत: माहिती दिली आहे. ‘मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!