आपला बीड जिल्हाक्राईम

साळेगाव येथेल अवैद्यरित्या गावठि दारूच्या आड्यावर पोलीसांची धाड !!

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील साळेगाव येथे आरोपी शाहु नथु पवार याच्या घराच्या आडोश्याला विनापरवाना बेकायदेशिररित्या गावठी (हातभट्टी ) दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित जिन्नस तसेच तयार दारू स्वःताच्या कब्जात बाळगुन तिची चोरटी विक्री करत असल्याची खात्री होताच त्यांच्यावर पोलिस पथकाने धाड टाकुण आरोपी शाहु नथु पवार याच्याकडुन 25 लिटर गावठी हातभट्टी तयार दारू1250/ रू. व केन्ड किमंत 100 रु एकुण 1350 तसेच 200 लिटर क्षमतेच्या बॅरल मध्ये गुळ मिश्रीत रसायण 150 लिटर प्रती लिटर 30 रुपये प्रमाणे 4500 रु लोखंडी कॅन्ड 200 रुपये एकुण 6050 रु किमंतीचे सामान जप्त केले म्हणुन फिर्यादी पोना.राजु सकलाती गुंजाळ याच्या फिर्यादीवरून आरोपी शाहु नथु पवार वय 50 वर्ष रा. साळेगाव याच्या विरुद्ध 422/2022 कलम (ई) (फ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास केज पोलिस ठाण्याचे सपोनि मिसळे यांच्या आदेशाने पोना.काळकुटे हे करत आहेत .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!