आपला बीड जिल्हाआपले केजक्रीडा
तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड शाखा केजच्या वतीने बेल्ट वितरण व खेळाडू सत्कार समारंभ संपन्न

वादळवार्ता – केज
आज दि 26 फेब्रूवारी रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदीर केज येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड शाखा केजच्या वतीने बेल्ट वितरण व खेळाडू सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला .
सदरील कार्यक्रमास विद्यार्थ्यांना यल्लो बेल्ट , ग्रिन बेल्ट , ग्रिन1 बेल्टसह प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन राज्य अध्यक्ष अविनाश बारगजे होते तर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन सामाजीक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रमुख पाहुणे विकास मिरगणे (उपाध्यक्ष मराठवाडा चेम्बर्स ऑफ कॉमर्स बीड ) , पत्रकार अजय भांगे , मगर सर , राष्ट्रीय खेळाडू सचिन कांतागळे , केज तालुका क्रिडा संयोजक विनोद गुंड सर , भूतरकर उपास्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बंन्सी राऊत यांनी केले तर यावेळी अविनाश बारगजे , विकास मिरगणे , विनोद गुंड यांनी मनोगत व्यक्त केली तर केज तालुक्यातील सर्व शाळेमध्ये क्रिडा विषयाचा शिक्षक असताना मात्र तासीका होतं नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळाविषयी माहिती मिळत नाही असे अध्यक्षीय समारोपाच्यावेळी हनुमंत भोसले सर यांनी मत व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद गुंड यांनी केले तर आभार सचिन कांतागळे यांनी मानले .



