आपला बीड जिल्हा

केज सार्वजनिक स्मशानभुमीचा चबुतरा कोसळुन होऊ शकते जीवितहानी ? भाग तीन

आठरापगड जातीच्या लोकांना पडलेला प्रश्न

ग्रामपंचयात अस्तित्वात असताना उभा केलेला चबुतरा जीर्ण अवस्थेत .

वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब 

पंधराव्या वित्त आयोगामधुन अनुसुचीत जाती ,जमातीच्या विकासाठी मोठा निधि प्राप्त असताना देखील केज नगरपंचायंत प्रशासनाची विकासकामे करण्यास उदासिनता.

केज येथील क्रांतीनगर च्या कांही अंतरावरती असलेल्या स्मशानभूमीची अवस्था प्रशासनानाच्या ढिसाळ कारभारामुळे विकासापासून कोसो दुर असतानाचे चित्र केज शहरामधील आठरापगड जातीच्या लोकांना पहावयास मिळत आहे . सदरील स्मशानभुमी मध्ये ना पथदिव्यांची सुविधा आहे ना पाण्याची सुविधा आहे अंतिम संस्कार करण्याकरीता आलेल्या कुटुंबाना मृत व्यक्तिस अखेरचे पाणी पाजण्याकरीता , इकडे तिकडे फिरावे लागते. स्मशानभूमीमध्ये स्वच्छतेचे तसेच अन्य काम करणारे घनसारवडे यांना त्यांच्या कुटुबांचे संगोपन करण्यासाठी नगरपंचायत कडुन कसल्याच प्रकारचे मानधन दिले जात नाही.

केज ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सार्वजनिक स्मशानभूमीच्या चबुतर्‍याचे बांधकाम साधारण वीस वर्षापूर्वीचे आहे . सदरील चुबुतर्‍याचे चारही पिलेरचे सिमेंट निघुन पडलेले असल्यामुळे चबुतऱ्याच्या छताला मोठ मोठे तडे गेलेले असल्यामुळे भविष्यामध्ये जीवीतहानी होण्यास नाकारता येणार नाही .

संबधित केज नगरपंचायचे मुख्याधिकारी देशपांडे तथा विकासाची गंगा घरोघरी म्हणणारे सत्ताधारी याकडे लक्ष देतील का ?

कि वाट पहात आहेत सार्वजनिक स्मशानभुमीचा चबुतरा कोसळुन जीवतहानी होण्याची अशीच चर्चा सध्या केज शहरातील जनतेमध्ये सुरु आहे .

__________________________

केज नगरपंचायत करिता पंधराव्या वित्त आयोगामधुन मोठ्या प्रमाणात निधि प्राप्त असताना देखील अत्यअवश्यक सुविधा करिता प्राध्यान्याने खर्च करणे गरजेचे असताना पुर्वीच्या व आताच्या सत्ताधार्यांनी स्मशानभूमीचा कोणताच विकास केला नाही . तात्काळ स्मशानभूमीचे विकासकामे सुरु केली गेली नाहीत तर केज नगरपंचायतला समोर उग्र स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल.

दिपक कांबळे ( केज तालुका अध्यक्ष )

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

__________________________

 

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!