वादळवार्ता वार्तांकन – केज
केज तालुक्यातील मस्साजोग येथील रामदास दशरथ कदम वय 60 वर्षे व्यवसाय शेती रा. मस्साजोग व त्याचा मावसभाऊ आश्रुबा भानुदास गायकवाड हे दोघे 17 डिसेंबर रोजी सायं. 7 वाजता आपल्या घरी जात असताना पाठीमागून मोटार सायकल चालक क्र. MH 14 EN 6274 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटार सायकल हयगईने व निष्काळजिपणे भरधाव वेगात चालवुन फिर्यादीचा मावस भाऊ आश्रुबा भानुदास गायकवाड यास पाठीमागुन जोराची धडक देवुन दुखापतीस कारणीभुत झाला म्हणुन रामदास दशरथ कदम याच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात आज्ञात मोटार सायकल चालकाविरुद्ध गुरनं 586 / 2022 कलम 279,337,338 भादंवी गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. गिते करत आहेत.