आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केज जवळ भरधाव वेगात असलेली कार पलटी होऊन एक ठार तर दोघे गंभीर जखमी

वादळवार्ता – गौतम बचुटे

दि. १३ एप्रिल रोजी गुरुवारी मध्यरात्री १२:३० गुरुवार रोजी केज-कळंब रोडवरील विठाई पुरम वस्तीजवळ भरधाव वेगातील महेंद्रा एस यु व्ही गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या हॉटेलात घुसून पलटी झाली. त्यात एकजण जागीच ठार झाला तर तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. १३ एप्रिल रोजी रात्री १२:३० जालना जिल्ह्यातील परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे व नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे राहणार वाढोना तालुका परतुर हे त्यांच्याब महेंद्रा एसयूव्ही क्र. (एम एच-१७/ ए जे-५३८२) या गाडीने कळंबहुन केजच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. मात्र भरधाव वेगातील गाडीवरचे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्यांची गाडी केज येथील विठाई पुरम जवळील माऊली सिनेमा गृहाच्या जवळ रोडवर पलटी झाली आणि ही गाडी तेथील एका हॉटेलमध्ये घुसली. या भीषण अपघातात रामेश्वर भास्कर तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आतील जखमी व मृतांना बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका चालक मकरंद घुले आणि वैद्यकीय अधिकारी शेख आणि मुंडे यांनी त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हलविले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या अपघातातील मयत आणि जखमी हे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे नातेवाईक असल्याचे समजते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!