वादळवार्ता – केज
बीड रोड लगत कदमवाडी जवळ असलेल्या शिवशाही हॉटेलचे मालक नितीन शहाजी खाडे वय ४५ वर्ष रा. कानडीमाळी यांचा मृतदेह शिवशाही हॉटेलमध्येच लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे.
घटनास्थळी केज पोलिस प्रशासन दाखल झाले असुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले आहे. तर हि हात्या कि आत्महत्या ? अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
दरम्यान मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.नितीन शहाजी खाडे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे, तर नितीन खडे यांच्या मृत्यूमुळे त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!