वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
आम्हाला लग्नात मानपान दिला नाही तसेच ट्रक घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रु घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी नवरा सासू सासऱ्यासह चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील आंधळेवाडी येथे गंगुबाई विकास सारूक हिला तिचा नवरा विकास आत्माराम सारूक सासरा आत्माराम निवृत्ती सारूक, सासु चिंगुबाई आत्माराम सारूक व विवाहित नणंद यांनी संगनमत करून तिच्या आई-वडीलांनी लग्नात काही मानपान दिला नाही. असे म्हणुन शिवीगाळ करत लाथा बुक्याने मारहाण केली. तसेच चौदा टायरची ट्रक घेण्यासाठी तिच्या आई-वडीलांकडुन ५ लाख रूपये आण. असे म्हणुन शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीररीक मानसिक त्रास देऊन छळ केला. तसेच उपाशी पोटी ठेवुन ठेवले आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी पीडित विवाहित गंगुबाई विकास सारूक हिच्या तक्रारी वरून नवरा विकास आत्माराम सारूक, सासरा आत्माराम निवृत्ती सारूक, सासु चिंगुबाई आत्माराम सारूक आणि नणंद यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५१३/२०२२ भा. दं. वि. ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करणयात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस धायगुडे या पुढील तपास करीत आहेत.