आपला बीड जिल्हासामाजीक
बीडमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने विधवा महिलांचा झाला अनोखा सन्मान
25 महिलांना साडी, चोळी वाटप - आई नाना प्रतिष्ठानचा पुरोगामी उपक्रम

वादळवार्ता – बीड
मकर संक्रांतीच्या अनुषंगाने राजमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या महान विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ॲड. प्रेरणा सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून 25 विधवा महिलांचा साडी, चोळी देऊन सन्मान करण्यात आला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने बीड शहरात विधवा महिलांना मिळालेल्या अनोख्या सन्मानाचे सामाजिक क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.
आई नाना प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आगळी वेगळी संक्रांत बीड शहरात साजरी करण्यात आली. मकर संक्रांतीच्या दिवशी विधवा महिलांना योग्य सन्मान दिला जात नाही. किंबहुना विधवा महिला मकर संक्रांतीपासून दूर राहतात. जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांचा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी आपण बीड शहरात विधवा महिलांचा साडी, चोळी देऊन यथोचित सन्मान केला. हा सन्मान सोहळा शाहू संकुल, डॉ. यशवंत जाधव हॉस्पिटल जवळ, सम्राट चौक, बीड येथे पार पडला. कुसुम सुरवसे, अनिता निंबाळकर,मंगल जगताप, राणी शेख, द्वारका ठोंबरे, रुख्मिन नागापुरे, सोनी शिवलिंग, जया वाघमारे, नंदा जोगदंड आदींसह 25 महिलांनी यावेळी सहभाग घेतला. तब्बल 25 महिलांना यावेळी साडी, चोळी देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
विधवा महिला सन्मानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी:
ॲड. प्रेरणा सुर्यवंशी



