आपले केजक्राईम

चोरटे काय चोरतील याचा नेम नाही ? साळेगाव येथुन सोलार प्लेट, केबल आणि वीज वाहक तारांची चोरी

वादळवार्तागौतम बचुटे

केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे विद्युत साहित्य चोरीचे प्रमाण वाढले असल्याने शेतकरी चिंतीत आहेत त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

साळेगाव ता. केज येथून चिंचोली माळी रस्त्या लगतच्या लिंबाजी राऊत यांच्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाच्या नऊ प्लेट चोरीला गेल्या आहेत. तसेच गांजी रस्त्या लगतच्या संभाजी सरवदे यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील वीज वाहक तार चोरीला गेली आहे. त्याच बरोबर माळेगाव लवण नावाने ओळखल्या जात असलेल्या भागातील अविनाश गित्ते, ज्ञानोबा गित्ते, सुभाष गालफाडे, रामदास गित्ते आणि माणिक गित्ते यांचे केबल वायर चोरीला गेले आहे. ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळेलाच विद्युत साहित्यांची चोरी झाल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी अडचणीत आले आहेत.

या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी आणि पोलिसांना माहिती दिली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!