आपला बीड जिल्हाआपले केजक्रीडा

कार्तिक चटपला नॅशनल तलवार बाजी मध्ये ब्रॉझ मेडल ; केज तालुक्यातील कार्तिकची गगनभरारी…

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज तालुक्यातील जानेगाव येथील शेतकरी कुटुंबातील कातिर्क रामप्रसाद चटप या विध्यार्थने स्वताची जिद व मेहनतीने तलवारबाजीत ब्रॉझ पदक मिळवून केज तालुक्याच्या वैभवात भर टाकली आहे कातिर्क चे आई वडिल दोघेही शेती करतात पण शेती करत असताना त्यांनी मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून कातिर्कला संत मिराबाई शाळा औरंगाबाद या ठिकाणी शिकणासाठी ठेवले कार्तिक सध्या इत्ता आठवी च्या वर्गात शिक्षण घेत आहे

केरल येथील कोची या ठिकाणी १० जानेवारी ते १३ जानेवार जुनिअर नॅशनल तलवारबजी स्पर्धेत झालेल्या २४ व्या नॅशनल तलवारबाजी स्पर्धेमध्ये, कार्तिक रामप्रसाद चटप रा. जानेगाव, तालुका केज, जिल्हा बीड २४ सावी नॅशनल तलवारबाजी स्पर्धेतून ब्रॉंझ हे पदक महाराष्ट्र राज्याला मिळवून दिले आहे आणि यापुर्वी सुद्धा कार्तिक चटप यांने क्रिडा संकुल अहमदनगर येथे ८,९,१० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या २४ साव्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत फॉइल फॉईल या प्रकारात कांस्य पदक मिळवले होते कार्तिक चे केज परिसर व बीड जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन व कौतूक होत आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!