आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

खबरदार जर कायदा आणि सुव्यस्थेला बाधा आणाल तर…..!

शिघ्र कृती दल आणि पोलीसांचे गुन्हेगारांना धडकी भरविणारे पथ संचलन

वादळवार्ता वार्तांकन – केज

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर कोणी कायदा व सुव्यस्था बिघडवीत असेल आणि दंगल घडविण्याचा प्रयत्न केला. तर त्याचे जागीच कंबरडे मोडून काढीत कायदेशीर बंदोबस्त केला जाईल. हे दाखविण्यासाठी केज शहरातून केंद्रीय सुरक्षा दलाच्या शीघ्र कृती दल आणि पोलिसांनी शस्त्र-अस्त्रासह केज शहरातून संयुक्त पथ संचलन केले.

बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय सुरक्षा दलाचे शिघ्र कृती दलाची तुकडी आणि केज पोलिस यांच्या जवानांनी अत्याधुनिक शस्त्र आणि मशिनगन, स्वयंचलित हत्यारे, सुरक्षा रक्षक ढाल, शिरस्त्राण, बॉडी प्रोटेक्टर्स, बॉम्ब रोधक जॅकेट्स, गुन्हेगारांचे वेध घेन्यासाठी वाहनावर बसविलेले कॅमेरे, जमावाला काबूत आणण्यासाठी पाण्याचे फवारे, अश्रू धुराचे नळकांडे व लॉन्चर याचे प्रदर्शन करीत असामाजिक घटकांच्या उरात धडकी भरविणारे केज शहरातील प्रमुख रस्त्यावरून पथ संचलन केले. हे पथ संचलन शिघ्र कृती दलाचे डेप्युटी कमांडंट शशिकांत राय (पीएमजी) यांच्या नेतृत्वाखाली आणि निरीक्षक प्रमोद कुमार, जनसंपर्क अधिकारी रामनाथ डोंगरे, केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्यासह शीघ्र कृती दलाचे ७० जवान आणि केज स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तरित्या पथ संचलन केले. यामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर कोणी आगळीक केली तर त्याचा प्रसंगी बळाचा वापर करून तात्काळ बंदोबस्त करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

अत्याधुनिक वाहने आणि शस्त्र :- पथसंचलन करणाऱ्या जवानांकडे अत्याधुनिक हत्यारे आणि संरक्षणाचे साहित्य व अत्याधुनिक सुविधा असलेली वाहनांचा ताफा बघून नागरिक चकित झाले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!