आपले केजसामाजीक

निवडणुकीत पराभुत उमेदवाराने केला प्रभागामध्ये स्वखर्चातून विकास ; सत्ताधारी झोपेत

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज नगरपंचायतच्या सुस्त कारभारास वैतागुन पाठीमागे प्रभाग क्र.११ मधील नगरसेविकेने बंड करून अंदोलनाचा पवित्रा हातात घेत स्वखर्चातुन प्रभागातील बोअरवेल तथा इतर विकासाची कामे केली होती. तथा केज नगरपंचायच्या ढिसाळ कारभारावरती शंका उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु सुस्त प्रशासनास याचा कोणताही परिणाम झाला नाही.

आता तर चक्क केज नगरपंचायतच्या पराभूत उमेदवारानीच विकासाची मालीक हातात घेत प्रभागाचा स्वखर्चातून विकास करण्याचे ठरविले आहे.

पाठीमागे साधारण एक वर्षा पुर्वीच्या झालेल्या केज नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र.१७ मधुन केवळ ११ मतांनी पराभुत झालेले उमेदवार शद्दु खतीब यांच्याकडे प्रभागातील नागरीक गेले असता त्यांनी टिपू सुलतान चौक कळंब रोडवरील नाल्यावरती असणारा पुल तुटलेला असल्यामुळे नागरिकांना तथा विद्यार्थ्यांना येण्या – जाण्यासाठी त्रास होत आहे तसेच त्यांनी नगर पंचायत प्रशासनास वारंवार या संदर्भांत सुचना देऊनही पुलाचे काम केले नाही म्हणुन आपण पाठपुरावा करावा असे कळताच पराभुत उमेदवार शद्दु खतीब यांनी तात्काळ स्वखर्चातून सदरील पुलाचे बांधकाम करुण केज न. प.च्या झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्याचे काम केले आहे.

प्रभाग क्र. १७ मधील पराभूत उमेदवार शद्दु खतीब यांनी पराभूत होऊनही स्वखर्चातून केलेल्या विकासामुळे त्यांची प्रभागात तथा केज शहरात चर्चा होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!