वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील लाखा येथे केज पोलिसांनी कारवाई करून वाळू चोरी होत असताना दोन ट्रॅक्टर ताब्यात घेत चौघावर कारवाई केली आहे.

या माहिती अशी की, केज तालुक्यातील लाखा येथील मांजरा नदी पात्रातून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळताच मंगळवार दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वा. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक मतीन शेख, संतोष गित्ते, चंद्रकांत काळकुटे, बजरंग इंगोले या पोलिस पथकानेधाड टाकली त्यावेळी लाखा शिवारामध्ये मांजरा नदीचे पात्रामध्ये दोन अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळू चोरी करून ट्रॅक्टर मध्ये मिळुन आले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक व मालक यांचेवर कारवाई करून ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांच्या फिर्यादी वरून चाँद दगडु तांबोळी (रा. शेरी गल्ली, कळंब), शौकत मुबारक शेख (रा. इस्लामपुरा, कळंब), राजाभाऊ अंबादास घाडगे, अशोक नामदेव घाडगे (रा. लाखा) यांच्य विरुद्ध दि. ९ नोव्हेंबर रोजी गु. र. नं. ५१६/२०२२ भा. दं. वि . ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत .