वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
आज मौलाना आझाद उर्दू प्रथामिक शाळा केज येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये लोकसहभागातून व शिक्षकाकडून वर्ग पहिली ते सातवी तील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मौलाना हाफीजवखारी अब्बास रजा होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन हाजी उमर साहेब , विद्यार्थ्यांना गणवेश देणारे हाजी इनामदार नईमोदी , इनामदार मोहसीन हाजी महंमद मिया , इनामदार फैजुद्दीन उर्फ चाचू , हाजी वाजिद खैरूमिया खुरेशी यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्फत गणवेशाचे वाटप केले या कार्यक्रमाला पालक वर्ग आवर्जून उपस्थित होता . तसेच संस्थेचे अध्यक्ष इनामदार नसिरुद्दीन , संस्थेचे सचिव शेख जलालुद्दीन ,संचालक मंडळ अन्सारी मैनोद्दीन व हाजी फारुखी सादेक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व कार्यक्रमास मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापिका शेख रुकसाना बेगम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान यखिन खन ने केले तर आभार प्रदर्शन अब्दुल सादेक सर यांनी मानले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!