वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यात जिवाचिवाडी येथे शेतातील पिकात म्हैस चारु नको असे म्हणतात म्हशीच्या मालकाने शेत मालकाला संगनमत करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण झाली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे चारा खाल्ला म्हशीने अन् मार खाल्ला शेत मालकाने असा प्रकार घडला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २६ रोजी राजेभाऊ दादाराव चौरे यांच्या शेतात शेतात संदीप राजेभाउ चौरे हे त्यांची म्हैस चारीत असल्याचे पाहून राजेभाऊ चौरे हे त्यांना शेतात म्हशी चारू नको; असे म्हणाले. त्या वरून दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:०० च्या सुमारास राजेभाऊ दादाराव चौरे यांच्या घरासमोर संदीप राजेभाउ चौरे, लुकेश राजेभाउ चौरे, राजेभाउ बापुराव चौरे आणि लक्ष्मण बारीकराव चौरे यांनी संगनमत करून राजेभाऊ दादाराव चौरे यास कुऱ्हाडीच्या दांडयाने हातावर, कंबरेवर आणि मांडीवर मुक्कामार दिला. तसेच आम्हाला येथे जनावरे चारु नका; असे का म्हणालास? असे म्हणुन शिवीगाळ केली आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला आम्ही जीवे मारुन टाकु. अशी धमकी दिली.
या प्रकरणी राजेभाऊ दादाराव चौरे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात संदीप राजेभाउ चौरे, लुकेश राजेभाउ चौरे, राजेभाउ बापुराव चौरे आणि लक्ष्मण बारीकराव चौरे सर्व रा. जिवचिवाडी ता केज यांच्या विरुद्ध गु. र. नं. ४८८/२०२२ भा. दं. वि. ३२४,३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर संगिता राजेभाऊ चौरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचा मुलगा शेतात काम करीत असताना यातील आरोपी राजेभाऊ दादाराव चौरे याने तुझ्या म्हशी आमच्या शेतात का आल्या ? असे कारण काढुन राजेभाऊ दादाराव चौरे याने काठीने संगिता राजेभाऊ चौरे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारुन जखमी केले. तसेच लुकेश राजेभाउ चौरे आणि राजेभाउ बापुराव चौरे यांनी शीवीगाळ करुन लाथाबुक्याने करून म्हशी जर पुन्हा शेतात आल्या तर जीवत मारुन टाकतो अशी धमकी दिली.
या प्रकरणी संगिता राजेभाऊ चौरे यांच्या तक्रारी वरून संदीप राजेभाऊ चौरे, लुकेश राजेभाउ चौरे, राजेभाऊ बापुराव चौरे आणि लक्ष्मण बारीकराव चौरे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ४९१/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.