आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज

अस्वच्छतेपाई भाजपा वैद्यकीय जिल्हाध्यक्षांचा एल्गार ; स्वातंत्र्यदिनी तोडांला काळ्या पटट्या लावुन केज न.प च्या सत्ताधाऱ्यांचा करणार निषेध

वादळवार्ता – केज

हल्ली महाराष्ट्रातील राजकारणात पक्षफुटीमुळे कोण सत्ताधारी आणी कोण विरोधक याचा कांही ताळमेळ सर्वसामान्य जनतेला लागनं कठीन होऊन बसले आहे. यामुळे शहर व गाव पातळीवरील राजकारण पार बदलुन गेले आहे. मात्र सर्वसामान्य नागरीकांना कोणावर विश्वास ठेवावा व कोणावर नाही , कोणाचा कोणता पक्ष व त्याचा कार्यकर्ता कोण वा पदाधिकारी कोणत्या पक्षाचा हे गणित जुळवणे कठीण झाले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुदरम्यान जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून अद्रष्य भाजपा पक्षाची मदत घेत निवडुकीत यश संपादन केले. केज नगरपंचायतवर सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची हातमिळवणी केली. मात्र सत्ताधार्‍यांचा ढिसाळ कारभार मग तो स्वच्छतेचा असो कि स्वच्छ पाण्याचा वा विकासांचा कांही दिवसातच सर्व केजकरानी अगदी जवळुन अनुभवला आहे. आशातच ऐन स्वातंत्र्यदिनी केज नगरपंचायच्या वतीने स्वांतत्र्य दिनाच्या दोन कार्यक्रम पत्रीका केज शहरातील नागरीकांना वितरीत केल्या आहेत . त्यामध्ये दि. १४ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाच्या उद्‌घाटक म्हणुन भाजपाचे केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन भाजपाचे जेष्ट नेते रमेशराव आडसकर हे उपस्थित रहाणार आहेत मात्र भाजपाचे वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. वसुदेव नेहरकर यांनी केज मंगळवार पेठेतील अस्वच्छतेला कंटाळुन , वैतागुन थेट नगरपंचायतच्या सत्ताधार्यांना झोपेतुन जागे करण्यासाठी सोशल मिडीयाचा आधार घेत व्हॉट्सॲप व्दारे मंगळवार पेठेतील व्यापार्‍यांना ऐन स्वातंत्र्यदिनी सत्ताधांऱ्याचा निषेध करण्यासाठी तोंडाला काळ्या पट्या लावुन अंदोलन करण्याचे ऐलान केले आहे. त्यांनी व्हॉट्सॲप संदेशाव्दारे असे म्हटले आहे कि

“गेली अनेक दिवसांपासून मंगळवार पेठ ची साफसफाई नगरपंचायत करत नाही वारंवार लोकप्रतिनिधी व प्रशासनास विनंती करून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही रोज सकाळी दुकाने उघडताना व्यापाऱ्यांना रस्ता साफ करावा लागतो ही बाब आत्यंत चुकीची आहे तरी आपण सर्वांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी नगरपंचायत च्या झेंडावंदन वेळी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून नगरपंचायत परिसराची व मंगळवार पेठेत आपल्या आपल्या दुकानासमोरील साफसफाई करून केज नगरपंचायत प्रशासनास जागे करू व करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे फोटो वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी,सर्व सोशियाल मेडिया ,इलेक्ट्रॉनिक्स मेडिया व पत्रकार बांधवाना पाठवून केज नगरपंचायत प्रशासनाला जाग आणू “

आशा पद्धतीने व्यापार्‍यांना आव्हान केल्यामुळे व यामध्ये सत्ताधारी भाजपाचे , आमदार भाजपाचे , जेष्ट नेते भाजपाचे आणी अंदोलनकर्तेही भाजपाचे असल्यामुळे या अंदोलनाकडे केज शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!