दहा भाविक किरकोळ जखमी
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज-बीड रोडवर रात्री 9:15 वा. होळ येथे मुंबईहून देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची प्रवाशी गगाडी क्र. (एम एच-04/ जी पी-1388) ही डिव्हायडरला धडकून पलटी झाली. यात दहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे स पो नि डॉ. संदीप दहिफळे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. रस्त्यावरील गाडी बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत सुरू करण्यात येत आहे. या अपघातातील जखमींना गाडी बाहेर काढून त्यांच्यावर प्रथमोचार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बापू केंद्रे यांनी मदत केली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!