वादळवार्ता वार्तांकन – केज
दिनांक 3 जानेवारी 2023 क्रांतीज्योती,भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती नंदिग्राम मा. व उच्च मा. विद्यालय, नांदुरघाट ता.केज येथे ” बालिकादिन व महिला मुक्तीदिन” म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री एस.बी.शिंदे सर व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठशिक्षक श्री एस.एस. खाडे सर हे उपस्थित होते.काही विद्यार्थिनींनी ,सावित्रीबाई फुले च्या जिवनावर विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
जेष्ठशिक्षक श्री.एस.एस.खाडे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला.शेवटी अध्यक्षीय मनोगतातून सर्व उपस्थिताना प्राचार्य श्री.एस.बी.शिंदे सरांनी साविञीमाई फुले यांच्या जिवनावर आपले विचार व्यक्त केले आणि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.दयानंद हांगे सरांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक श्री.लाड सर,श्री.मोरे सर,श्री.क्षीरसागर सर,श्री.कांबळे सर,श्री.अरूण तांबडे ,श्री,दादा सोनवणे, श्री.तय्यब पठाण, यांनी प्रर्यत्न केले व उपस्थितांचे आभार श्री.एस.के.धुमाळ सर यांनी मानले आणि खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.