वादळवार्ता – गौतम बचुटे
दुचाकी वरून जात असताना रस्त्यात अचानक एक शामेलिऑन जातीच्या सरडा दिसताच गाडी थांबवून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून एका फोटोग्राफरने जीवदान दिले.
दि. २१ मार्च रोजी दुपारी ३:३० वा च्या सुमारास केज तालुक्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर दत्तात्रय देशमुख हे त्यांच्या मित्रा सोबत राजेगाव येथे एका वर्ग मित्राच्या पत्नीचा प्रथम पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आटोपून केजकडे जात होते. दत्तात्रय देशमुख व त्यांचे मित्र नाव्होलीकडे जाणाऱ्या चौका जवळ आले असता त्यांना अचानक रस्त्यावर एक दुर्मिळ अशा शामेलिऑन जातीचा सरडा रस्ता ओलांडीत असताना आढळला. तो सरडा रस्त्याच्या मधोमध होता. दत्तात्रय देशमुख यांनी कोणतीही पर्वा न करता अचानक ब्रेक लावून दुचाकी थांबविली आणि तो बघ शामेलिऑन म्हणून आनंदाने मोठ्याने ओरडले. नंतर दत्तात्रय देशमुख व त्यांच्या मित्रांनी रस्त्यात थांबून जो पर्यंत तो शामेलिऑन सरडा शेतात सुरक्षित स्थळी जात नाही; तो पर्यंत रस्त्यात थांबून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.
दत्तात्रय देशमुख हे फोटोग्राफी आणि व्हीडिओ चित्रीकरण करण्यासाठी तसेच प्रसिद्धी माध्यमांसाठी पूर्वी त्यांनी फोटोग्राफी केलेली आहे. परंतु एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याला वाचविण्यासाठी त्यांनी निव्वळ त्याचे फोटो न घेता किंवा व्हीडिओ न करता घेतलेले परिश्रम हे वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्यामुळे निसर्गातील एका दुर्मिळ वन्यप्राण्याला जीवदान मिळाले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!