राज्य

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा मराठवाडा संपर्क दौरा संपन्न

मराठवाड्यातील कार्यकर्त, पदाधिकार्‍यांशी साधला संवाद

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

मराठवाड्यातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मराठवाडयातील कार्यकर्ते , पदाधिकारी यांना होऊ घातलेल्या महानगर पालीका, नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समीती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडुक संदर्भांने मराठवाडा दौर्‍याचे आयोजन केले होते.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी मराठवाडा संपर्क दौऱ्यातील पहिल्या दिवशी संभाजीनगर, बीड आणी भुम तर दुसऱ्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथिल शासकीय विश्रामगृह येथे संपर्क दौरा संपन्न करूण दरम्यान शिवसेना मध्यवर्ती कार्यालयला भेट दिली आणि आई तुळजाभवानी मातेची मंदिरात मनोभावे आरती करून महाराष्ट्राचे लोकनायक मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांना महाराष्ट्राच्या जनतेची कामे करण्यासाठी बळ दे अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना केली.

यानंतर लातूर, नांदेड , हिंगोली या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संपर्क साधुन परभणी येथे मराठवाडा दौर्‍याचा समारोप करण्यात आला.

यावेळी युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य अभिमन्यू अर्जुनराव खोतकर,अविनाश खापे तसेच शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख संभाजीराजे पलंगे ,ज्ञानेश्वर (माऊली) इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेनेची आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी ,सतीश झिरपे, निखिल घोडके,सुदर्शन जाधव,अभिजित पाटील यांचेसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!