वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
भारतीय बौद्ध महासभा केज तालुका शाखा यांच्या वतीने,वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले.
सदरील माहिती अशी की, आज आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरू पोर्णिमा आज पासून तीन महिने वर्षावास प्रवचन मालिका सुरू होते. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांत वर्षावास धम्म प्रवचन करण्यात येतो बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रतेक गावातील बौद्ध विहारामध्ये याचे आयोजन करण्यात येते. बौद्ध भिक्खू यांनी धम्माचे महत्व समजावून सांगितले जाते. तथागत गौतम बुद्ध यांनी पाच शिष्यांना घेऊन पहिले धम्म आणि त्याच मार्ग यांच प्रवचन केले त्यांना सांगितले की जा आणि या तीन महिन्याच्या कालावधीत प्रतेक गावातील बौद्ध विहार मध्ये धम्म प्रवचन मालिका सुरू केली. म्हणून आज केज तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आले याचे उद्घाटन केज तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा सचिव बाबासाहेब धन्वे सर, प्रर्यटन सचिव अरुण पटेकर व जेष्ठ मार्गदर्शक डॉ ठोके सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका पदाधीकारी तथा जेष्ठ मार्गदर्शक उत्तम आप्पा मस्के, बौद्ध उपासक व उपासिका बालक,बालीका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!