आपला बीड जिल्हा

परळी येथे तेली समाजाच्या वतीने १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

वादळवार्ता प्रतिनिधी परळी वैजनाथ
      परळी येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी  शनैश्वर प्रतिष्ठान, तेली युवक संघटना, शनैश्वर महिला मंडळ, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी व समाजातील विशेष यश प्राप्त केलेल्यांचा गौरव समारंभाचे आयोजन रविवारी (ता.१०) करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
              कार्यक्रमास अध्यक्ष विठ्ठल आप्पा चौधरी, प्रमुख पाहुणे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर फुटके, तेली युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष वैजनाथ बेंडे,शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार आदि उपस्थित होते. दर्शन मंडप सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. मान्यवरांचा शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.प्रविण फुटके यांनी मांडल्यानंतर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपले ध्येय निश्चित केले पाहिजे,निश्चित केलेले ध्येय पुर्ण करण्यासाठी आत्मविश्वास, मेहनत, चिकाटी हे गुण आवश्यक आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेतले पाहिजेत असे प्रतिपादन केले. तर अरविंद येरणे,उत्तम साखरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी स्पर्धा परिक्षेत यश मिळवल्याबल श्रुती क्षीरसागर व भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो चे प्रशिक्षण पूर्ण केल्याबदल महिमा मल्लिकार्जुन साखरे हिचा सन्मान करण्यात आला तसेच माधव आप्पा फकिरे यांच्या स्मरणार्थ घड्याळ विद्यार्थ्यांना मनगटावरील घड्याळ तर नागनाथ सोनटक्के यांनी बारावी सायन्स मध्ये समाजातून प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना २१०० ,१५०० रुपये नगदी रोख बक्षीस वितरण करण्यात आले. व १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृती चिन्हे, प्रमाणपत्र, व घड्याळ,बक्षिसे देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर फुटके यांनी केले तर आभार प्रा.मधूकर शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शनैश्वर प्रतिष्ठान, तेली युवक संघटना,शनैश्वर महिला मंडळ व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रयास समाजातील महिला, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!