आपला बीड जिल्हा

नाव्होली येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जयंतीला गावकऱ्यांचा भरभरुन प्रतिसाद ;बँडच्या गाण्यावर तरुणाई थिरकली

वादळवार्ता वार्तांकन -महादेव काळे

 साहित्य रत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साऱ्या राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असुन वर्षानुवर्षे चालत आलेल्या या जयंती उत्सवाला कोरोनाने गेली दोन वर्षे खंडीत केले होते. मात्र सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सारेच सण उत्सव आता अगदी थाटामाटात साजरे होवु लागल्याने त्याच पध्दतीने अनेक महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यथिती जनतेने उत्साहात साजरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच १ ऑगस्ट या दिवशी साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र साजरी होत असल्याने नाव्होली येथेही दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दि. ५ ऑगस्ट रोजी गावाकऱ्यांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात आण्णाभाऊंची जयंती साजरी केली.

जग बदल घालुनी घाव,सांगुन गेले मज भिमराव.. असे समाजाला छाती ठोकून सांगणारे काव्य सम्राट, लेखणी सम्राट, साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून अनेक पोवाडे, कथा , कादंबऱ्या लिहुन समाज बदलण्याचे मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या फकिरा या कादंबरी मुळे त्यांना परदेशात सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या शाहिरीतुन समाजाची दशा बदलुन दिशा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजात दिवसेंदिवस बदल होत असुन समाज प्रगतीच्या दिशेने कुच करत असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे. आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या कार्याचा आदर्श पुढच्या पिढीने घेण्यासाठी आज सर्वत्र त्यांचा जन्मत्सोव राज्यभर मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही केज तालुक्यातील नाव्होली येथेही दि. ५ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. तसे हे गाव म्हणजे सर्व जाती धर्माचे असुन या ठिकाणचे सारे जण सर्व सण उत्सव व साऱ्या महापुरुषांच्या व संत महंताच्या जयंती ,पुण्यतिथी असे कार्यक्रम एकत्र येवुन साजरे करतात. या ठिकाणी सर्वधर्म समभाव व बंधुभाव जोपासला जात आहे. दि ५ ऑगस्ट रोजी गावातील सर्व युवकांनी एकत्र येवुन साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी १०:०० वाजले पासून गावकऱ्यांना स्वादिष्ट जेवन दिले तर दुपारी ४:०० वा गावातील मुख्य रसत्यावरुन आण्णाभाऊंच्या प्रतिमेची मिरवणूक बँडच्या निनादात व तोफांच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषपुर्ण वातावरणात मोठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बँडच्या गाण्यावर गावातील तरुणाई थिरकल्याने या मिरवणुकीला आगळावेगळा रंग आला होता.या मिरवणुकीचा समारोप गावातील हनुमान मंदिरासमोरील लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे चौकात करण्यात आला.या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच मा. दिलिपराव बिक्कड, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य , से.स.सो.चे चेअरमन संदिप बिक्कड, मा. चेअरमन रंजित बिक्कड यांचेसह माजी सरपंच गावकरी, महिला गावातील सर्व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती कमेटिच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या मिरवणुसाठी नांदुरघाट पोलीस चौकीचे जमादार श्री. भालेराव व पो. कॉ.उगलमुगले यांनी चोख बंदोबस्त ठेवुन कार्यक्रम यशस्वी केला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!