
केज । प्रतिनिधी
महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात घडली एका खाजगी क्लासेसच्या शिक्षकानेच पवित्र नात्याला काळीमा फासली मात्र बीड जिल्ह्यात असंख्य अनधिकृत कोचिंग क्लासेस सुरु आहेत ना त्याची नोंद सरकारी दप्तरात आहे ना पुस्तकात.
या बाबत वृत असे कि केज शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खाजगी कोचिंग क्लासेस उभारले गेले असून त्यापैकी बरेचसे क्लासेस कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय बिनधास्त सुरू आहेत. या क्लासेसमध्ये काही ठिकाणी अगदी १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश दिला जात असल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने केज तहसिलदार यांना दैनिक वादळ वार्ताचे संपादक अजय भांगे यानी निवेदन दिले असता तहसिल कार्यालयातून मंडळ अधिकारी तथा ग्रामीण मंडळ अधिकारी यांची समिती स्थापन करून सर्व खाजगी कोचिंग क्लासेसची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक कोचिंग क्लासवर कारवाई करण्यात येणार असून त्यांच्याकडील परवानग्या, शिक्षकांचे पात्रता प्रमाणपत्र, इमारतीचे वापर परवाना, अग्निसुरक्षा यंत्रणा , जमा केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची फीस व त्यांच्या पावत्या अशा सर्व बाबींची तपासणी केली जाणार आहे.
या कारवाईमुळे शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता येईल, आणि दर्जेदार शिक्षणास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पालक व्यक्त करत आहेत.
केज शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस यांची तपासणी करण्यात येणार असुन आता ‘दुध का दुध और पाणी का पाणी’ होणार, यात शंका नाही.
कोणताही कोचिंग क्लासेस परवानगी शिवाय चालू आढळल्यास त्यावर त्वरित बंदी आणली जाईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासोबतच पालकांनीही अधिकृत क्लासमध्येच मुलांना प्रवेश द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
श्री.राकेश गिड्डे
तहसिलदार केज


