गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाची कारवाई
वादळवार्ता – गौतम बचुटे
केज येथे गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाने शहरात दोन मटका बुक्क्यावर धाड टाकून दोन मटका बुक्की एजंट आणि दोन मटका चालक यांच्यावर कारवाई केली त्यांच्या कडुन रोख आणि इतर साहित्य मिळून ३३ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
दि. १० मार्च रोजी केज शहरात मटका बुक्की सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हेगार शोध शाखा (डी बी) पथकाला गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे, डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि महादेव बहिरवाळ यांनी केज बस स्टँड जवळील एका पान टपरीवर धाड टाकली,. त्या वेळी ज्ञानोबा मोरे हा कल्याण नावाचा मटका घेत होता आणि तो जमा झालेले पैसे मटका बुक्की मालक शेख चाँद यांना देत असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच दुपारी २:३० वा. च्या सुमारास या पथकाने केज शहरांतील कानडी रोड लगतच्या रंगोली ड्रेसेस या कपड्याच्या दुकाना समोर पप्पू जाधव हा चालता फिरता मटका घेत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने हा मटका जलील अल्लाउद्दीन शेख याच्यासाठो घेत असल्याचे सांगितले.
या दोन्ही धाडीत पोलिसांनी नगदी रकमेसह ३३ हजार ३७० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम यादव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या तक्रारी वरून ज्ञानोबा मोरे, पप्पू जाधव यांच्यासह मटका बुक्की मालक शेख चाँद आणि जलील अल्लाउद्दीन या चार जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!