Uncategorized
पठ्याने ! स्वःताचे अडीज लाख रुपये खर्चून केला सार्वजनिक रस्ता ; सामाजीक कार्यकर्त्यांची गावात होत आहे चर्चा

वादळवार्ता – केज
ग्रामीण भागाकरिता जिल्हा परिषद , पंचायत सामिती आणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गाव पातळीवरचा रस्ता , नाले , पथदिवे वा इतर विकास व्हावा याकरिता केंद्र शासन , राज्य शासन वेळोवेळी लाखो करोडो रुपये खर्च करतात त्यामध्ये आमदार निधी , खासदार निधी सुद्धा असतो मात्र तो निधी जिथे गरज आहे तिथे न वापरता इतरत्र फिरवला जातो . यामुळेच कांही मोजकेच गावाचा विकास करणारे कार्यकर्त आमदार , खासदार यांना विनवनी न करता गावच्या विकासामध्ये हातभार लावतात. याचेच उदाहरण म्हणजे केज तालुक्यातील साबला गावचे सामाजीक कार्यकर्ते दत्ता काकडे.
या बाबत वृत्त असे की केज तालुक्यातील साबला गावात साबला ते श्री संतसावता वस्ती येथेल 1.5 कि.मी असणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. साबला तसेच श्री संतसावता वस्ती मधील स्थानिक नागरीकांनी पाठीमागील दहा वर्षापासुन वेळोवेळी केज विधानसभेच्या आमदारांना रस्त्याची मागणी केली परंतु कक्त तोंडी अश्वासन देऊन दुर्लक्षित केले गेले . रस्त्याची बिकट अवस्थेचे आमदार महोदयानां गांभीर्य न वाटल्यामुळे गावातीलच सामासाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे ज्यांचा कि मुख्य व्यवसाय शेती आहे त्यांनी सदरील रस्ता कसल्याही पारिस्थिती मध्ये करायचा ठरवला आणी साबला ते श्री संतसावता वस्ती येथेल 1.5 दिड कि.मी. चा रस्ता करायला सुरुवात केली आणी बघता बघाता पावसाळ्या पूर्वीच रस्ता पुर्ण केला आहे. सदरील रस्ता करण्यासाठी त्यांना अंदाजे अडीज लाख रुपये खर्च आला त्यामुळे सामाजीक कार्यकर्ते दत्ता काकडे यांची पंचक्रोशीत चर्चा आहे.
जर गावातील , वस्तीतील , मोहल्यातील विकासकामे शेतकऱ्यांना, कष्टकर्यांना स्वताच स्वःच्या पैशांनी करावी लागत असली तर आमदार काय करतात ? करोडो रुपयांचा निधी जातो तरी कोणाच्या घशात ? आदि प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
आमदाराला , सरपंचाला वेळोवेळी रस्त्याची मागणी केली परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही .परंतु दत्ता काकडे यांनी स्वतःच्या खिशातुन पैसे खर्च करून रस्त्याचे काम केले त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा आहे.
काशीनाथ गोवर्धन नाईकनवरे
माजी. उपसरपंच साबला
रस्ता छान झाला आहे याचे सर्व श्रेय दत्ता काकडे यानाच जाते.
आभिमान साहेबराव नाईकनवरे
वस्तीतील रहिवाशी



