आपला बीड जिल्हाक्राईम

सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची चंदन चोरावर कारवाई

वादळवार्ता/केज

आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी मा.पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे गांजी शिवार ता.केज शिवारामध्ये चंद्रकांत पटणे राहणार गांजी यांचे शेताचे बांधावरील चंदनाची झाडे दोन इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या तोडून तिची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती मा. पंकज कुमावत साहेब यांनी त्यांचे पथकातील पोलीस हवालदार बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गीते, विकास चोपणे,अनिल मंदे व प्रकाश मुंडे यांना देऊन तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गांजी ते सोनीजवळा जाणारे रोडचे दक्षिण बाजूस चंद्रकांत पटणे यांच्या शेताकडे जाऊन छापा टाकला असता दोन इसम जागीच मिळून आले. त्यांना पंचासमक्ष त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे1. रणजीत निवृत्ती बचुटे रा.गांजी , विद्वान प्रभू रणदिवे रा.तांदुळजा ता.जि. लातूर असे सांगितले. सदरचा चंदनाचा माल कोणास विक्री करता असे विचारले असता,त्यांनी सदरचा चंदनाचा माल आम्ही बालाजी जाधव रा.केज व कनकेश्वर गायकवाड रा. मुरुड ता.जि. लातूर यांना विक्री करतो असे सांगितले.सदर कारवाई मध्ये एकूण ५७,५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यांना पोलीस स्टेशनला आणून वरील दोन आरोपी व चंदनाचा माल घेणारे बालाजी जाधव व कनकेश्वर गायकवाड रा.मुरुड ता. जि. लातूर यांचे विरुद्ध पोलीस ठाणे युसूफडगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील कर्मचारी बालासाहेब डापकर दिलीप गीते, अनिल मंदे, प्रकाश मुंडे, विकास चोपने यांनी केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!