Uncategorized

सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांची टीमची कामगिरी

वादळवार्ता वार्तांकन – शाकेर शेख

बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेले चौसाळा येथील खुलेआम पणे हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्षक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी चौसाळा येथील भरवस्तीत चालणारा अवैध हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून 200 लिटर हातभट्टी रसायन व 70 लिटर गावठी हातभट्टी दारू फेकून देऊन हा घर वस्तीत चालणारा हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे .

        नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना डोके वर काढले असून चौसाळा येथील अनेक भागात अवैध दारू विक्री होत असून नागरिकांच्या वतीने वेळोवेळी या संदर्भात पोलीस विभागाला तक्रार देण्यात आल्या होत्या .

नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी चौसाळा येथे एका हातभट्टीवर थेट कारवाई करत राजरोसपणे सुरू असलेल हातभट्टी कारखाना उद्धस्त केला .पोलीस कारवाईमुळे चौसाळा परिसरात अवैध धंदे चालकात खळबळ माजली असून इतर अवैध धंदे वाल्यांचे धाबे दनानले आहेत . मुख्य म्हणजे चौसाळा बस्थानक परिसरात गेल्या अनेक वर्षापासून हातभट्टी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे . खुलेआम दारू विक्री होत असल्याने चौसाळा परिसरातील तरुण वर्ग व्यसनाधीन झाला आहे , तरुणाचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या गंभीर बाबीचा विचार करता चौसाळा परिसरात संपूर्ण दारू मुक्ताती मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे ज्या प्रकारे हातभट्टी अड्ड्यावर कारवाई झाली त्या पद्धतीने पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी इतर अवैध धंदेवाल्याचे कंबरडे बोलावे असे सूर परिसरातून निघत आहे या कारवाईत आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांचे सह नेकनूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते .

चौसाळा बसस्थानकाच्या समोरील हातभट्टी दारूचे अड्डे बंद केव्हा होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारात आहे या हातभट्टी दारूच्या अड्ड्यामुळे बस स्थानक परिसरातील येणाऱ्या महिला वर्गाला तडीरामाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असून लवकरात लवकर हे हातभट्टी दारूचे अड्डे कायम बंद करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!