Uncategorized

शमिभा पाटील यांना फरफटत नेणाऱ्या पोलिसानंवर गुन्हा दाखल करा – वंचित बहुजन आघाडी

वादळवार्ता – केज

तृतीयपंथ्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य कारुन तृतीयपंथ्याच्या भावना दुखावल्या मुळे दाद मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महिला व युवा आघाडीच्या सदस्या शमिभा पाटील बंड गार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथे गेल्या असता त्यांच्यावरच पोलिसांनी झडप घातल्यामुळे केज येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदरील पोलिसानंवर गुन्हा दाखल करावा यासाठी केजचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे कि भाजप आमदार नितेश नारायन राणे हे सातत्याने समाजात धर्म जात व लिंग आधारित वक्तव्य करत असून समुह-समुह जाती – जातींना द्वेष व तेढ निर्माण करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंतीय बहलचे अपमानजनक वक्तव्य विकृतीचा भाग नसून प्रवृत्ती झाली आहे. अशी प्रवृत्ती समाजात लिंग धर्म व जातीच्या नावाने द्वेष व तेढ निर्माण करते माननीय सर्वोच न्यायलयाने अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांना तात्काळ गुन्हे नोंदवा असे निदर्शित केलेले आहे. भाजप आमदार नितेश नारायन राणे यांच्या बेताल व अपमानजनक वक्तव्याचा विरोधात गुन्हा नोंदविण्या ऐवजी शमिभा ताई पाटील वंचित बहुजन आघाडी महिला व युवा आघाडीच्या सदस्या बंड गार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथे गेल्या असता दमदाटी व अपमानजनक वागणूक पोलिसांनी दिली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तक्रार देखील नोंवलीच नाही. या उलट त्यांना फरफटत पोलीस स्टेशन समोरून पोलीस घेऊन गेले हे अत्यंत बेजबाबदार व निंदनीय कृत्य असुन ज्या पोलिसांनी शमिभा ताई पाटील यांच्यावर हल्ला केला त्या पोलिसावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने न्यायालयीन मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे सदरील निवेदनावर वंचित बहुजन आघाडी केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के , सामाजिक कार्यकर्त्या गौरी शिंदे , लक्ष्मण ओव्हाळ , मयुरी सांळुके , सिद्धांत मस्के , प्रथमेश घोडके , अभिप्राय मस्के , सतीश धिरे , समाधान धिरे आदिच्या सह्या आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!