१८ कोटी खर्चुनही राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर चिखलमयच; बेशरमाची झाडे लावा आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे
१८ कोटी खर्चुनही राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर चिखलमयच; बेशरमाची झाडे लावा आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे
बीड प्रतिनिधी |
AC : बीड शहरातुन जाणा-या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट क्राॅक्रीट रस्त्याचे काम अपुर्णच असुन जालना रोड वरील काकु नाना हाॅस्पिटल ते राषट्रवादी भवन या दरम्यानच्या रस्त्यासाठी जवळपास १८ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला तरी सुद्धा रस्तेकाम अपुर्णच असुन बाजुचे साईडपट्टे काही ठिकाणी भरलेच नाहीत तर काही ठिकाणी मुरूमाने भरल्याने आता पावसाळ्यात त्याचा चिखल झाला असून रस्त्यावरील वाहने घसरून अपघात होत आहेत.
जालना रोडवरील दुभाजक अपुर्णच त्यात माती भरल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ
___
जालना रोडवरील दुभाजकांचे काम अर्धवट असुन दोन रस्त्यांच्या दुभाजकात अद्यापही माती भरलेली असुन आता ती दबल्याने खड्डे पडलेले आहेत त्यात वाहने अडकुन अपघाताचे प्रमाण वाढले आहे तर चारचाकक,दुचाकी स्वाराकडुन पादचा-यांच्या अंगावर चिखल उडत असुन त्यामुळे अनेकदा वाद झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
बेशरम प्रशासनाच्या निषेधार्थ बेशरमाची झाडे लावा आंदोलन; नितिनजी गडकरी;प्रकल्प संचालक यांना तक्रार
__
धुळे-सोलापूर सिमेंट क्राॅक्रीट रस्ता रखडल्या प्रकरणात जबाबदार कंत्राटदार-आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी दि.१ ऑगस्ट सोमवार रोजी जालना रोडवरील अर्धवट काम झालेल्या माती भरलेल्या दुभाजकात प्रशासनाच्या बेशरम धोरणाच्या निषेधार्थ डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,शेख युनुस च-हाटकर,सय्यद आबेद,मुबीन शेख यांनी बेशरमाची झाडे लाऊन निषेध व्यक्त करण्यात येणार असून उर्वरित रखडलेले अर्धवट काम तात्काळ पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.



