वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज तालुक्यातील सारणी सांगावी येथील मूळ राहिवासी असलेले डॉ.प्रतापसिंह निवृत्ती सारणीकर यांची जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गात नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांना सहाय्यक संचालक हिवताप अधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती मिळली आहे. डॉ. प्रतापसिंह सारणीकर हे वैद्यकिय अधिकारी म्हणून प्रा. आ. केंद्र येळंबघाट येथे सतरा वर्ष कार्यरत होते.
या काळात त्यांनी सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, कुटुंब कत्याण कार्यक्रमा अंतर्गत दर आठवड्याला
शिबीर तसेच पल्स पोलीओ मोहिम खूप चांगल्या प्रकार राबवली होती. वेळोवेळी भेटी दिलेल्या पंचायत राजकमिटीने पण त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. सेवेअंतर्गत पदवित्तर पदवी एम. डी. पी. एस. एम हा अभ्यासक्रम त्यांनी पुणे येथे करून येथेच सहायक वैदयकिय अधिकारी म्हणून ते सद्या कार्यरत होते. त्यांच्या या निवडीबद्दल
अड विजय पंडित, डॉ. विकास जोगदंड, डॉ. हिंगमिरे, डॉ. मुकुंद सुपेकर, डॉ. मिर्झा बेग, डॉ. शार्फ, डॉ. बबन जाधव तसेच तानाजी कदम, सम्राट कदम, बाबासाहेब कदम, कुंडलीक वंजारे, विठ्ठल वंजारे, नानासाहेब काकडे, मधुकर सिरसट, गुलाब सिरसट, विशाल ओव्हाळ यांच्यासह चाकरवाडी येथील नागरिक व ग्रामस्थ यांनी त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!