प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक आक्रमक
वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
केज शहरातील जनतेला संभ्रमात टाकुन जनविकास आणी कॉंग्रेसची आघाडी यांची केज नगरपंचायत वरती सत्ता आल्यापासुन केज नगरपंचायत या ना त्या कारणाने तसेच नगसेवकांच्या अंदोलनामुळे सतत चर्चेत आहे.
सुरुवातीला कॉंग्रेस पक्षातीलच माजी नगरसेवकांचे प्रभाग क्रमांक 7,8,9 च्या विकासासाठी आमरण उपोषण , नंतर प्रभाग क्रमांक 11 च्या नगरसेविका यांनी मुख्याधिकारी हजारे यांना लेखी तक्रार देऊन , वैतागुन स्वखर्चातून प्रभागाचा विकास करण्याचे ठरवले आणी आता प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक विकासाठी आक्रमक.
सविस्तर वृत्त असे कि प्रभाग क्रमांक एक मधुन अजहर इनामदार मोठ्या मताधिक्याने निवडुन आलेले आहेत . ज्या ठिकाणाहुन ते निवडुन आले आहेत त्या भागात अनु.जाति /जमाती /ओबीसी/ओपन मतदारापैकी जास्त संख्या अनु.जाति /जमातीची आहे. इतर प्रभागाच्या तुलनेत प्रभाग क्रमांक एक हा मोठ्या प्रमाणात विकासापासुन वंचित राहिलेला आहे. केज नगरपंचायतच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात विकास निधी प्रभाग एक साठी मंजुर, उपलब्ध असुन देखील व प्रशासकीय मान्यता मिळुन देखील केज न.प.च्या प्रशासनाने सदरील मान्यता मिळालेल्या कामांच्या कार्यालयीन प्रक्रिया पुर्ण केल्या नाहीत म्हणुन तात्काळ कार्यालयीन प्रक्रिया पुर्ण कराव्यात अन्यथा दहा दिवसानंतर अंदोलन करण्याचा इशारा प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक अजहर इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केला आहे.